यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी विसरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रेरणादायी /  जीवनात यशाची उंची गाठायची असेल तर काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. तर काही गोष्टी विसरून पुढे गेले पाहिजे. कारण आपण बऱ्याच गोष्टी डोक्यात ठेवतो आणि त्यामुळे प्रयत्न करताना नाकारात्मक विचार आपल्या मनात येत असतात. जीवनात एका उंचीवर पोचण्यासाठी काही गोष्टी मनातून काढून टाकणे फार महत्वाचे असते कारण त्यानेच यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.

भूतकाळातील अपयश – आपल्या जीवनात अनेक गोष्टी करत असताना आपल्याला लगेचच यश मिळत नाही, त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. मात्र जर जीवनात मिळाले अपयश उराशी बाळगून पुढे जायचे ठरवेल तर आपल्या मनात अनेक नकारात्मक विचार येतात. आपल्याला अपयशच मिळेल अशी भावना आपल्या मनात तयार होत जाते,त्यासाठीच भूतकाळातील अपयश विसरून नवीन सुरवात करणे गरजेचे असते.

लोक काय म्हणतील? हा विचार – बऱ्याच वेळा आपल्या अनेक गोष्टी करायच्या असतात, मात्र ही गोष्ट केल्यावर लोक आपल्याला काय म्हणतील का? या विचाराने त्या आपण टाळतो. लोकांचा विचार करून आपण आपल्या मनातील गोष्टींना प्रतिबंध घालतो. आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या नवीन गोष्टी आपण करत नाही. मात्र लोकांचा विचार केल्याने आपण आपल्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी करण्यापासून दूर राहतो, आणि आपल्या जीवनाच्या शेवटाला याचा पश्चाताप होतो. त्यामुळेच लोकांचा विचार न करता आपल्या मनाचा विचार करणे फायदेशीर ठरते.

नकारात्मक विचार – जीवनात कोणती गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात सकारात्मक विचार असणे फार महत्वाचे असते. आपण एखादी गोष्ट करताना त्याबद्दल नकारात्मक विचार केला तर आपले कोणतेच काम पूर्णत्वास जाणार नाही. त्यामुळेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांना दूर ठेवले पाहिजे. नकारात्मक विचार केल्यास कोणतेही काम करताना उत्साह वाटत नाही, तर सतत काम होईल का नाही याची भीती राहते.
इतर महत्वाचे –

राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल

मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केला नक्षलवाद्यांनी हल्ला …

‘हे’ उद्योजक माढ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार …

Leave a Comment