Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Instagram-Facebook : अनेक युझर्ससाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेसेंजर डाऊन झाले आहेत. मेटाची मालकी असलेल्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. सर्व्हिस स्टेटस ट्रॅकर वेबसाइट असलेल्या DownDetector च्या बातमीनुसार, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्राममध्ये मोठा आउटेज दिसून आला आहे. यावेळी अनेक युझर्सनी ट्विटरद्वारे तक्रार केली आहे की, त्यांना या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या कॉन्टॅक्टना DM (डायरेक्ट मेसेज) पाठवण्यात अडचणी येत आहेत.

5 जुलै रोजी, DownDetector ने युझर्सकडून इंस्टाग्राम आउटेज रिपोर्टमध्ये वाढ दर्शविली, यामध्ये 1,280 हून जास्त युझर्सनी जवळपास रात्री 11:17 च्या सुमारास फोटो आणि व्हिडिओ-शेअरिंग सर्व्हिस मध्ये येत असलेल्या समस्या शेअर केल्या. 6 जुलै रोजी सकाळी 10:18 वाजता आउटेजमध्ये दुसरी वाढ दिसून आली. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरही युझर्सना देखील ही अडचण येत आहे.

अनेक युझर्स कडून राग व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर मीम्स शेअर करण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे ट्विटरवर #InstagramDown ट्रेंड करत आहे. मात्र या आउटेजबद्दल अद्याप मेटाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://about.facebook.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर तपासा

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा झटका !! घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‘इतकी’ झाली वाढ

‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

Business Idea : फुलांच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे कमवा हजारो रुपये !!!

Leave a Comment