कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

रोहन रवींद्र मंकणी (३७, रा. सहकारनगर), रवींद्र माशाळकर (३४, रा. लातूर), मुकेश मोरे (३७, रा. येरवडा), राजशेखर ममिडा (३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (४५, वाशीम, सध्या औरंगाबाद), आत्माराम कदम (३४, मुलुंड, मुंबई), वरूण वर्मा (३७, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि विकासचंद यादव (२५, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करून आयसीआयसीआय, एचडीएफसी व इतर पाच बँकांतील निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवला, या सर्व बँक खात्यांत जवळपास २ अब्ज १६ कोटी २९ लाख रूपये होते, अशी माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळातच एका कारमधून एक तरूण आला, त्यानंतर आणखी पाच जण व एक महिला आली. पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४0 रूपयांची शिल्लक असलेल्या बँक खात्यांचा डेटा आढळून आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment