आंतरराष्ट्रीयआरोग्यताज्या बातम्यासांस्कृतिक

जगभर साजरा होतोय योग दिवस

आंतरराष्ट्रीय|गेल्या पाच वर्षांपासून, प्राचीन भारतीय प्रथांच्या फायद्यांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी २१ जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. ११ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि कल्पना प्रस्तावित केल्याच्या काही महिन्यांनंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने २१  जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केले.

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ या संकल्पनेचा असोक मुखर्जी भारताच्या राजदूतांनी परिचय करुन दिला आणि १७७ राष्ट्र सह-प्रायोजक म्हणून सामील झाले, जे आज पर्यंतच्या कोणत्याही आमसभेच्या महासभेसाठीची  सर्वोच्च संख्या आहे.

‘ग्लोबल हेल्थ अँड फॉरेन पॉलिसी’ रेझोल्यूशनच्या एजेंडा अंतर्गत मान्य करण्यात आले आहे की योग “मानसिक,शारीरिक आणि आत्मिक आरोग्या साठी फायदेशीर आहे आणि योगा त्यासाठी आपल्याला समग्र दृष्टीकोन देतो”

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०१९ साठी विषय

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०१९  चा विषय  हवामान बदल आहे आणि गुरुवारी (२० जुन) संयुक्त राष्ट्रांमध्ये “गुरुंसह योगा” आणि त्यानंतर २१ जून रोजी पॅनेल चर्चा आयोजित केली जाईल.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares