हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजरा केला जातो. बीअर डेची सुरुवात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सांताक्रूझ येथील स्थानिक कार्यक्रमाने झाली. यापूर्वी हा कार्यक्रम स्थानिक पातळीवरच साजरा केला जात होता. पण हळूहळू त्याची ओळख वाढत गेली आणि ती एक आंतरराष्ट्रीय घटना बनली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजरा केला जातो. बिअर पिण्याचे काही फायदे असतात तर काही तोटेही असतात, याबाबत चला जाणून घेऊया…
बिअर पिण्याचे फायदे-
बीअर ही तृणधान्ये आणि यीस्टपासून बनवली जाते. काही संशोधनात असे समोर आले आहे की कमी प्रमाणात बिअर प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बिअरमध्ये अल्कोहोल असते जे रक्तातील साखरेची पातळी काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी बिअर पिणे फायदेशीर ठरू शकते. हे इन्सुलिनचा प्रतिकार कमी करते आणि बिअरमुळे लोकांमध्ये मधुमेहाचा धोका कमी होतो.
माफक प्रमाणात बिअर प्यायल्याने स्त्री-पुरुषांची हाडे मजबूत होतात आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो
बिअर प्यायल्याने किडनी स्टोन, म्हणजेच मुतखडा निघून जातो ही केवळ अफवा नाही तर खरंच आहे. बिअरमुळे या खड्यांचे छोटे तुकडे होतात, आणि ते युरिनवाटे निघून जातात असेही म्हंटल जात.
बिअर पिण्याचे नुकसान-
सतत बिअर पिल्याने तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
बिअरच्या एका कॅनमध्ये 153 कॅलरीज असतात. याचे रोज सेवन केल्यास वजन वाढेल.
बिअर पिणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचा धोका बिअर पिणाऱ्या लोकांपेक्षा अनेक पटीने जास्त असतो.
संशोधनात असे दिसून आले आहे की जास्त बिअर पिल्याने सिरोसिस सारख्या यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.
अल्कोहोलच्या सेवनाने क्रोनिक पॅन्क्रियाटाइटिस या रोगाचाही धोका संभवतो
हळू हळू लिव्हरला सूज येते