अरे देवा! कोरोनाच्या थैमानानंतर आता जगावर घातक ‘चापरे’ विषाणूचं संकट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे अमेरिका आणि संपूर्ण जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. ‘चापरे’ हा घातक विषाणू आढळला आहे. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’नेही (सीडीसी) याला दुजोरा दिला आहे. या विषाणूची एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संसर्गाची बाधा होण्याचा धोका आहे. चापरे विषाणूबाधित असलेले काही रुग्ण दक्षिण अमेरिकेत आढळले आहेत. या आजाराची लक्षणे डेंग्यू आणि इबोलासारखी आहेत. या विषाणूंची बाधा झाल्यास ताप येतो आणि या तापाचा परिणाम थेट मेंदूवर होतो. या विषाणूंमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक कॉलिन कार्लन यांनी सांगितले की, बाधित व्यक्तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंनाही या विषाणूची बाधा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाधा होण्यास सुरुवात झाल्यानंतर चापरे संसर्गामुळे आरोग्य व्यवस्था आणखी कोलमडून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या चापरेची बाधा झाल्यास कोरोना अथवा इतर तापाच्या आजारापेक्षा या आजाराची लक्षणे लवकर आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आजाराची लक्षणे आणि उपचार
चापरे विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींना ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर व्रण उठणे, डोळे चुरचुरणे आदी लक्षणे आढळून येतात. या आजारावर अद्यापही ठोस औषध, उपचार सापडले नसून करोनाप्रमाणेच या आजारावरही उपलब्ध असलेल्या औषधांद्वारे उपचार करण्यात येतात.

चापरे नाव का?
बोलिव्हियातील चापरे भागात हा विषाणू २००४ मध्ये आढळला होता. त्यावरून या विषाणूला चापरे हे नाव ठेवण्यात आले. मागील वर्षी बोलिव्हियात पाच जणांना या विषाणूची बाधा झाली होती. त्यातील तीनजण हे आरोग्य कर्मचारी होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment