ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीचे मन हेलावून टाकणारे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। ऑस्ट्रेलियात लागलेल्या महाभयानक आगीत येथील वन्यप्राणांवर बेतलेल्या संकटाची मन पिळवटून टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. कांगारूचे बेट अशी ओळख असणाऱ्या ऑस्ट्रेलिया बेटावर असंख्य कांगारू आगीच्या विळख्यात सापडून मृत्युमुखी पडले. जगातील कोआला प्रजाती केवळ ऑस्ट्रेलियात पाहायला मिळते. गोंडस आणि निरागस दिसणाऱ्या जीवांचे या आगीत झालेले हाल आपल्याला या आगीची भयावहता काय असेल याची कल्पना करून देतात.

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींचे मन हादरले. याचसोबत घनदाट जंगलातील जैवविविधाता क्षणात बेचिराख होत असल्याचे व्हिडिओ येणाऱ्या भविष्यात मानव जातीला कुठल्या संकटाना समोर जावं लागणार याची चेतावनी देणारे आहेत. या आगीमुळे येथे राहणारे रहिवाशी सुद्धा प्रभावित झाले आहेत. अनेकांना यात आगीत आपले घरदार गमवावे लागले आहे. तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. समोर काही व्हिडिओमध्ये आग विझवण्यासाठी अग्निशमन आणि सामान्य नागरिक कसे शर्थीचे प्रयन्त करताना दिसत आहेत.

या आगीचा विस्तार लक्षात घेता दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात १४ हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे, असे सांगण्यात येत आहे की, या भागात राहत असलेल्या १ लाख लोकांपैकी ७० टक्के लोक येथून निघून गेले आहेत. माऊंट होथममध्ये ६७ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा हा वेग ८० कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गिप्सलँडमध्ये तापमान ४० तर पूर्वोत्तरमध्ये ४५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हिक्टोरियात ८४ हजार हेक्टरवरील क्षेत्र नष्ट झाले आहे. या महाभयंकर आगीत तेथील वन्यजीवन खाक झालं आहे.

 

Leave a Comment