विस्तारवादी चीनने आता रशियाकडे वळवला मोर्चा; रशियातील ‘या’ शहरावर ठोकला दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । भारतानंतर आता विस्तारवादी चीनने रशियाकडे मोर्चा वळवला आहे. कोरोनामुळे टीकेचा लक्ष्य झालेल्या चीनला रशियाने पाठिंबा दिला होता. पण आता चीन त्याच मित्राच्या पाठीत खंजीर खूपण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने रशियातील शहर व्लादिवोस्तोकवर दावा केला आहे. हे शहर रशियाने द्वितीय अफीम युद्धात चीनला पराभूत केल्यानंतर मिळवलं होतं. चीन हे क्षेत्र तेव्हा गमावून बसला होता. दोन्ही देशांमध्ये 1860 मध्ये एक करार देखील झाला होता. पण चीन आता इतक्या वर्षानंतर पुन्हा या शहरावर आपला दावा सांगत आहे.

चीनने म्हटलं की, हे शहर आधी हैशेनवाई नावाने प्रसिद्ध होतं. ज्याला रशियाने चीनकडून हिसकावून घेतलं आहे. चीनने रशियाच्या विरोधात आता चुकीचा प्रसार सुरु केला आहे. एका सोशल मीडिया पोस्टवरुन हा वाद सुरु झाला आहे. चीनमध्ये रशियाच्या राजदूतांकडून चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट Weibo वर व्लादिवोस्तोक शहराबाबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओचा उद्देश व्लादिवोस्तोक शहराचा 160 वा स्थापना दिनाचा होता. पण चीनला हे सहन झालं नाही.

चीनचा फिलीपींस, मलेशिया, इंडोनेशिया सोबत देखील वाद सुरु आहे. रशियाचं व्लादिवोस्तोक शहर हे पॅसिफिक समुद्रात त्याचा महत्त्वाचा बेस आहे. हे शहर प्रिमोर्स्की क्राय राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. व्यापार आणि ऐतिहासिक रूपाने व्लादिवोस्तोक रशियासाठी महत्त्वाचं शहर आहे. रशियाचा मोठ्या प्रमाणात व्यापार याच मार्गातून होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment