कोरोनावरील वॅक्सिन सर्वात आधी रजिस्टर करण्यासाठी रशियाची धडपड; 12 ऑगस्टला सरकार देणार मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को । रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. Gam-Covid-Vac Lyo असं या वॅक्सिनचं नाव ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं हे पहिलं वॅक्सिन १२ ला रजिस्टर करणार असल्याचे रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जगभरातील वैज्ञानिक रशियन वॅक्सिनच्या विश्वसनीयतेवर चिंता व्यक्त करत आहेत. कोरोनावरील वॅक्सिन तयार करण्याच्या घाई गडबडीत आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. तसेच घाईघाईत या वॅक्सिनच्या उलट्या परिणामांचा सामना करावा लागू नये अशी चिंता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. परंतु, रशिया सर्वांच्या आधी वॅक्सिन लॉन्च करण्यासाठी धडपड करत आहे. तसेच रशियाकडून वॅक्सिन कोरोनावर प्रभावी असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. परंतु, यांच्या दाव्याला दुजोरा देणारं कोणत्याही वैज्ञानिकाची साक्ष प्रकाशित करण्यात आलेली नाही.

रशियाने कोरोनावरील या वॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल जवळपास २ महिन्यांपूर्वी सुरु केली होती. तसेच, रशियाने तयार केलेल्या वॅक्सिनबाबत अद्याप कोणताही वैज्ञानिक अहवाल प्रकाशित केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत हेदेखील स्पष्ट झालेलं नाही की, रशियाकडून वारंवार करण्यात येणारे दाव्यांवर कितपत विश्वास ठेवणं योग्य आहे. रशियातील वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, वॅक्सिन लवकर तयार करण्यात आली आहे, कारण ही आधीपासूनच कोरोनासारख्या इतर व्हायरससोबत लढण्यासाठी सक्षम आहे. असाच दृष्टिकोन जगभरातील इतर वैज्ञानिक आणि औषध कंपन्यांचा आहे. रशियातील संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैनिकांनी वॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलमध्ये व्हॉलिंटयर्स म्हणून काम केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment