कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वेलिंग्टन । न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी मंगळवारी सांगितले की, ऑकलंडच्या एका घरात कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग कुठे झाले हे कळालेलं नाही. पण देशात १०२ दिवसानंतर लोकल ट्रांसमिशन झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान जसिंडा अर्डर्न म्हणाल्या की, न्यूझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंडला बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवार रात्रीपर्यंत अर्लटवर ठेवण्यात येईल. लोकांना घरीच राहण्यात सांगण्यात येईल. बार आणि इतर अनेक व्यवसाय बंद राहतील.

पंतप्रधान जसिंडा म्हणाल्या की, ‘या ३ दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यास आणि माहिती संकलित करण्यास वेळ मिळेल. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा झाले हे समोर येईल. तसेच एखाद्या कार्यक्रमासाठी १०० लोकांची उपस्थिती मर्यादित असेल आणि लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे लागेल.’
आरोग्य महासंचालक ब्लूमफिल्ड म्हणाले की, ‘५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाचे लक्षणं होती. त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्याबरोबर राहणार्‍या इतर ६ जणांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये तीन लोकं ही पॉझिटिव्ह आले आहेत.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment