ISIS म्होरक्या बगदादी कुत्र्यासारखा ठार – डोनाल्ड ट्रम्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य‍ांनी अमेरीकेच्या सैन्याने आयसीसचा म्होरक्या बगदादी याला ठार केल्याची घोषणा केली आहे. तो भेकड होता आणि आज तो कुत्र्यासारखा मारला गेला असं म्हणत ट्रम्प यांनी बगदादीच्या घात्म्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र-अल बगदादी ठार झाला आहे. त्याच्यासोबत त्याची तीन मुलं आणि अनेक सहकारी देखील मारले गेले आहेत. बगदादी एका खंदकात लपून बसला होता. अमेरिकेच्या सैन्याने घेरल्यानंतर त्याने स्वतःसह आपल्या मुलांना भूसुरुंगाच्या सहाय्याने उडवून दिले.

अमेरिकेच्या सैन्य दलाने शनिवारी वायव्य सिरियात झालेल्या हल्ल्यात बगदादीला लक्ष्य केल्याचं वृत्त सीएनएनने सकाळी दिलं होतं. अमेरिकेच्या सैन्याने ISISच्या तळांवर हल्ला केला, त्यावेळी बगदादीवर निशाणा साधण्यात आला. अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याचा हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिलं होतं.

Leave a Comment