बैरूत स्फोटाच्या निषेधार्थ सरकारविरोधी प्रखर निदर्शनांतर पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

बैरूत । लेबनॉनची राजधानी असलेल बैरुत शहर ४ ऑगस्टला दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. बैरुतमध्ये बंदरातील गोदामात साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटच्या साठयामुळे हा स्फोट झाला. यामुळे आसपासचा परिसर अक्षरक्ष: बेचिराख झाला. या स्फोटात १६० नागरिकांचा मृत्यू झाला तर ६ हजार नागरिक जखमी झाले. या स्फोटांमुळे सर्वसामान्यांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड संतापाची भावना आहे. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु आहेत. जनतेतील सरकारविरोधातील वाढता असंतोष पाहता पंतप्रधानसह लेबनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने सोमवारी राजीनामा दिला.

मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द करण्यासाठी पंतप्रधान हसन दियाब राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री हमाद हसन यांनी दिली. असोसिएटड प्रेसने हे वृत्त दिले आहे. २ दिवसांपूर्वी पंतप्रधान हसन दियाब यांनी दूरचित्रवाहिनीवरुन संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी सुधारणा कार्यक्रमाचा आऱाखडा तयार करण्यासाठी वेगवेगळया गटांमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी दोन महिने पदावर राहण्याचा प्रस्ताव दिला होता. पण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडूनच त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हसन दियाब यांचे सरकार काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज पाहिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com