श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे, लहान बंधू राष्ट्रपती गोताबाय राजपक्षे यांनी दिली शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र,  प्रतिनिधी । श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांनी शपथ घेतली. वयाने लहान असलेले त्यांचे लहान भाऊ गोताबाय राजपक्षे यांनी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली.  ७४  वर्षीय राजपक्षे ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीपर्यंत  काळजीवाहू  पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
लहान बंधू गोताबाय यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतरच  महिंदा यांनी राष्ट्रपती सचिवालयात नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना आणि इतर अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणून महिंदा यांची हि दुसरी टर्म आहे. देशातील मोठ्या राजकीय गोंधळाच्या दरम्यान २०१८ मध्ये थोड्या काळासाठी ते पंतप्रधान होते. श्रीलंकेच्या सामर्थ्यवान आणि वादग्रस्त राजकारणी म्हणून राजपक्षे यांच्या कडे बघितले जाते.

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ एलाम (एलटीटीई) च्या विरोधात महिंदा आणि गोताबाय या दोन भावांनी निर्णायक नेतृत्व केले होते.   स्वत:चे  ”बंडखोर व सुधारणावादी”  असे वर्णन करणारे महिंदा यापूर्वी २००५-२०१५ पर्यंत देशाचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी महिंदा १९७० मध्ये देशातील सर्वात कमी वयातील खासदार होते.





 

Leave a Comment