वेदनादायक ! ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीत ४८ कोटी वन्यजीवांचा होरपळून मृत्यू

टीम हॅलो महाराष्ट्र। ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत जवळपास ४८ कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत ४८० मिलियन्स म्हणजेच जवळपास ४८ कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गमवावा लागला आहे.

या भयानक आगीत येथील वन्यप्राणांवर बेतलेल्या संकटाची मन पिळवटून टाकणारी छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. कांगारूचे बेट अशी ओळख असणाऱ्या ऑस्ट्रेलिया बेटावर असंख्य कांगारू आगीच्या विळख्यात सापडून मृत्युमुखी पडले. जगातील कोआला प्रजाती केवळ ऑस्ट्रेलियात पाहायला मिळते. गोंडस आणि निरागस दिसणाऱ्या जीवांचे या आगीत झालेले हाल आपल्याला या आगीची भयावहता काय असेल याची कल्पना करून देतात. ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींचे मन हादरले.

या आगीचा विस्तार लक्षात घेता दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात १४ हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे, असे सांगण्यात येत आहे की, या भागात राहत असलेल्या १ लाख लोकांपैकी ७० टक्के लोक येथून निघून गेले आहेत. माऊंट होथममध्ये ६७ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा हा वेग ८० कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गिप्सलँडमध्ये तापमान ४० तर पूर्वोत्तरमध्ये ४५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हिक्टोरियात ८४ हजार हेक्टरवरील क्षेत्र नष्ट झाले आहे. या महाभयंकर आगीत तेथील वन्यजीवन खाक झालं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com