काही सेकंदातच कोविड -१९ ला काढून टाकू शकतो माउथवॉश, हात धुण्याबरोबरच रुटीन मध्ये यालाही करा सामील : स्टडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एका वैज्ञानिक अभ्यासानुसार असे आढळले आहे की, प्रयोगशाळेतील माऊथवॉशच्या संपर्कात आल्यापासून कोरोनव्हायरस 30 सेकंदात मारला जाऊ शकतो. क्लिनिकल चाचणीत हे प्राथमिक निकाल समोर आले आहेत. याद्वारे, कोविड -१९ चे प्रमाण सामान्यपणे आढळणार्‍या माउथवॉशद्वारे रुग्णाच्या लाळेत कमी करता येते का हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला.

यूकेमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार कमीतकमी 0.07% सेटीपायरिडिनियम क्लोराईड (CPC) असलेल्या माउथवॉशने विषाणूचा सामना करण्यास सक्षम होण्याची आशाजनक चिन्हे दिली आहेत. मात्र, अहवालाचा आढावा घेणे बाकी असल्याचेही सांगितले गेले आहे. परंतु हा अभ्यास गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासाचे समर्थन करतो ज्यामध्ये असे आढळले की, सीपीसी-आधारित माउथवॉश (CPC based mouthwash) कोविड -१९ चा व्हायरल भार कमी करण्यास प्रभावी आहे.

अभ्यासामध्ये वापरल्या जाणार्‍या डेंटाइलसहित अनेक ब्रँडसचे माउथवॉश
या नवीन चाचण्या विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांकडून घेण्यात आल्या आणि एका व्यक्तीच्या घशातील स्थितीचे अनुकरण करण्यासाठी डेंटाइलसहित अनेक ब्रँडसचे माउथवॉश वापरण्यात आले. आता पुढील तपास विद्यापीठ रुग्णालयात क्लिनिकल चाचणीद्वारे केला जाईल आणि कोविड -१९ रूग्णांच्या लाळेतील व्हायरल लोड कमी करण्यात हे माउथवॉश किती प्रभावी आहेत हे निश्चित केले जाईल. या पुढील अभ्यासाचे निकाल 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात प्रकाशित केले जातील.

या 12-आठवड्यांच्या क्लिनिकल चाचणीमध्ये भाग घेणारा डेंटाइल हा यूकेमधील एकमेव माउथवॉश ब्रँड आहे. कार्डिफ विद्यापीठाचे प्रोफेसर डेव्हिड थॉमस हे प्रमुख आहेत. अभ्यासाचे शीर्षक आहे: “कोविड -१९ च्या विरोधात माउथवॉशच्या अँटी-व्हायरल अ‍ॅक्टिव्हिटीचे मापन”.

मोठ्या प्रमाणावर दुसरा अभ्यास आवश्यक आहे
डॉ. थॉमस म्हणाले, “हे माऊथवॉश तोंड धुवून प्रयोगशाळेतील विषाणूंचे प्रभावीपणे निर्मूलन करतात, तरीही ते रुग्णांवर कार्य करतात की नाही हे पाहण्याची आपल्याला अद्यापही गरज आहे. आणि आमच्या चालू असलेल्या क्लिनिकल अभ्यासाचा देखील हा मुद्दा आहे. ते पुढे म्हणाले, “हे पाहणे महत्वाचे आहे की, सध्याच्या अभ्यासानुसार रूग्णांमध्ये व्हायरल ट्रान्समिशनचा कोणताही थेट पुरावा आपल्याला मिळत नाही आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर अगदी वेगळ्या प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता आहे.”

ते असेही म्हणाले की, “सध्या सुरू असलेल्या क्लिनिकल अभ्यासातून कोविड -१९ मध्ये संक्रमित रूग्णांमध्ये एकवेळ माउथवॉशचा वापर झाल्यानंतर त्याचा परिणाम किती काळ राहतो हे आपल्याला दिसून येईल.” हात धुण्याप्रमाणेच दैनंदिन सवयींमध्येही माउथवॉश ही प्रक्रिया सामील केली जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment