इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर विवाहबंधनात; नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

क्रीडानगरी । शुभम भोकरे 

जगभरात समलिंगी संबंधाना मिळत असलेली मान्यता हा कौतुकाचा विषय ठरत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दोन मुलींनी एकत्र येऊन लग्न केल्याच्या घटनेला काही दिवसांचा अवधी उलटत असतानाच विश्वचषक विजेत्या इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर यांनी शुक्रवारी आपण लग्न केल्याचं जाहीर केलं. विश्वचषक झाल्यानंतरच आमच्या मनात हा विचार आला होता असं दोघीनींही सांगितलं. कॅथरीन ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील सार्वकालिक महान मध्यमगती गोलंदाजांपैकी एक असून, नॅट ही मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. गरजेनुसार अष्टपैलू खेळी करण्यात दोघीसुद्धा माहीर आहेत.

नॅट ही माझ्यावर नितांत प्रेम करते आणि मागील दीड वर्षांपासून आमच्यातील प्रेम अधिकच बहरलं आहे. माझ्यासाठी नॅट पेक्षा दुसरी चांगली जोडीदार मिळूच शकली नसती असं कॅथरीन म्हणाली. आपण ख्रिश्चन कुटुंबातून येत असल्यामुळे घरातील लोकांचा पहिल्यांदा या घटनेला कडाडून विरोध होता. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले आणि पुन्हा घरातील लोकांनाही समजून घ्यावं लागलं असं कॅथरीन पुढे म्हणाली.

Untitled design (35)

नॅटनेसुद्धा आपल्या नात्यावर प्रकाश टाकताना, आमच्याकडे एंगेजमेंट रिंग पहिल्यापासूनच होती, पण लोक काय म्हणतील या विचाराने आम्ही थोडं धास्तावलेलो होतो. आता मात्र स्वतःसाठी जगण्यातही वेगळाच आनंद आहे, आणि त्यासाठीच हे आयुष्य आहे असं समजून आम्ही दोघांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं नॅट म्हणाली. मला कॅथरीनकडून एक तरी बाळ हवंच आहे, जे मला माझ्या अंगा-खांद्यावर खेळवायचं आहे. आम्हाला आता खूप धमाल करायची आहे असंही नॅट पुढे म्हणाली.

Leave a Comment