२०१९ला जे महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही होणार; जो बायडन यांच्या भर पावसातील सभेनंतर रोहित पवारांची टिप्पणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषण सध्या सोशल मीडियावर चांगेलच चर्चेत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे. यानंतर अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Rohit Pawar on Joe biden rally in Florida)

जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (US Presidential Election 2020)

अमेरिकेत ३ दिवसांनंतर मतमोजणी आहे. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी चांगलाच जोर लावला आहे. नुकत्याच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे. तर ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे.

बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बायडन यांचे पाठिराखे कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment