आश्चर्य! जनतेसमोर बोलताना किम जोंग उन यांना अश्रू अनावर; नेमका काय आहे ‘हा’ किस्सा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे जनतेसमोर रडले असे सांगितल्यास कोणालाही विश्वास बसणार नाही. पण असं खरंच घडलं आहे. आपल्या क्रूर कृत्यासाठी प्रसिद्ध असलेले किम जोंग उन यांनी देशातील जनतेसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी किम यांच्या डोळ्यात चक्क अश्रू देखील आले होते. कोरोना व्हायरसच्या साथीच्या वेळी मी जनतेसोबत उभा राहू शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असं किम जोंग यांनी म्हटलं. किम जोंग उनने आपल्या पक्षाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण करताना भावूक झाले.

किम जोंग उन यांनी आपल्या भाषणादरम्यान कबूल केले की उत्तर कोरियाच्या लोकांच्या विश्वासावर ते खरे उतरु शकले नाहीत आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. हे सांगताना किम जोंग यांनी चष्मा काढून त्यांचे अश्रू पुसले. आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान कार्याची आठवण म्हणून किम म्हणाले की, मला हा देश चालवण्याची जबाबदारी दिली गेली असली तरी माझे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा माझ्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी पुरेसा नाही. आपल्या भाषणात किम जोंग उन म्हणाले की जगभरातील लोक कोरोनामुळे नाराज आहेत. यावेळी दक्षिण कोरियाबरोबर संबंध सुधारण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. किम यांच्या या वागणुकीवर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अमेरिका आलं उत्तर कोरियाच्या टप्प्यात
उत्तर कोरियाने अण्वस्त्रांसह सज्ज असलेल्या 22 चाकांच्या वाहनावर जागतिक स्तरावरील अण्वस्त्र क्षेपणास्त्र Hwasong -15 जगासमोर आणलं. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या कोणत्याही कोपऱ्यात हल्ला करण्यास सक्षम आहे, असा तज्ञांचा दावा आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी नुकतेच आपल्या लष्करी परेडमध्ये हे क्षेपणास्त्र दाखवले. तज्ज्ञांनी सांगितले की हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात लांब क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment