लातूरकर सौरभ अंबुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान; उद्गीरकरांचा जल्लोष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । लातूर

शत्रूला धडकी भरवणरे ‘राफेल’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना ‘राफेल’ उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे. स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांचे उदगीर हे आजोळ आहे. कर्नाटकातील बिदर हे त्यांचे मूळ गाव असले तरी त्यांचे आई-वडील दोघेही उदगीर येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नोकरीस होते. सौरभ अम्बुरे यांचे प्राथमिक शिक्षण उद्गीरमधीलच विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल येथे झाले आहे. त्यांचे पुढील शिक्षण हे साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे झाले आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे उदगीरकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment