धक्कादायक! पृथ्वीच्या आकाशगंगेत एलियन्सच्या ३० वसाहती असण्याची शक्यता 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेले अनेक वर्षे पृथ्वीच्या बाहेरही जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विविध ग्रहांवर जीवसृष्टी स्थापन करता येईल का हेही शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परग्रहांवर राहणाऱ्या प्राण्यांना एलियन्स म्हंटले जाते. त्यामुळे मानवाला नेहमीच या एलियन्स बाबत चिकित्सक वृत्ती राहिली आहे. पण प्रत्यक्षात ते आहेत की नाही हे कुणालाही माहित नाही. मात्र यासंदर्भात संशोधन करणाऱ्या काही शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आकाशगंगेत अशा एलियन्सच्या ३० वसाहती असू शकतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. युरेका अ‍ॅलर्ट या वेगवेगळे अहवाल प्रकाशित करणाऱ्या वेबसाईटवर यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.पृथ्वीवर ज्या पद्धतीने जीवसृष्टीची निर्मिती झाली त्या परिस्थितीशी तुलना करुन आकाशगंगेमध्ये परग्रहवासीयांच्या किती वसाहती असू शकतील याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

आपल्या आकाशगंगेत असणाऱ्या या एलियन्सनी आपला किंवा आपण त्यांचा शोध घेणे एवढाच अवकाश बाकी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. एका नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालात हे समोर आले आहे. नॉर्टींगहम विद्यापिठातील खगोलशास्त्र विषयाचे प्राध्यापक ख्रिस्तोफऱ कन्सीलीस यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं. “आपल्या आकाशगंगेमध्येच परग्रहवासीयांच्या काही डझन वसाहती असतील. एका ग्रहावर विद्वान आणि बृद्धीमान जीवसृष्टी तयार होण्यासाठी ५०० कोटी वर्षांचा कालावधी लागतो. पृथ्वीवरही जवळजवळ इतकेच वर्षांनंतर आजचा मानव अस्तित्वात आला. प्रचंड मोठ्या अंतराळामध्ये म्हणजेच कॉस्मिक स्केलवर विचार केल्यास किती जीवसृष्टी असतील याचा अंदाज बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. या गणिताला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिकल कोपर्निकन लिमीट असं म्हणतो,” असी माहिती कान्सीलीस यांनी दिली.

संशोधक टॉम वेस्टबे यांनी सांगितले की, जीवसृष्टीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केल्यास अवकाशातील परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध लावणे सोपे जाते. “दोन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिकल कोपर्निकन लिमीट म्हणजे ५०० कोटी वर्षांचा कालावधी किंवा त्यानंतर सुरु होणार कालावधी. पृथ्वीवरही आजचा मानव निर्माण होण्यासाठी ४५० कोटी वर्ष लागली. सुर्यामध्ये असणाऱ्या धातू इतका साठा असणाऱ्या ताऱ्यांचा आम्ही शोध घेतला. याच शोधाच्या आधारे आम्ही केलेला अभ्यास आणि गणितानुसार आपल्या आकाशगंगेमध्ये अंदाजे ३६ वसाहती अस्तित्वात असणार असं आम्हाला वाटतं,” अशी माहिती टॉम यांनी दिली.

या अभ्यासामध्ये सद्यस्थितीत अवकाशगंगेत ३० बुद्धिजीवी वसाहती असतील असा दावा करण्यात आला असून त्यांचे वयोमान १०० वर्षे इतके असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन सजीव सृष्टींमधील अंदाजे अंतर १७ हजार प्रकाशवर्ष इतके असण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे.“जर आपल्याप्रमाणेच इतर ठिकाणी सजीव सृष्टी आहे असं सिद्ध झालं तर पुढील काही शतकांपेक्षा अधिक काळ आपले अस्तित्व टिकून राहिल. मात्र अशाप्रकारची कोणतीही सजीवसृष्टी अस्तीत्वात नसल्याचे आढळून आले तर आपल्या स्वत:च्या अस्तित्वासंदर्भात हा एक वाईट संकेत असेल. एलियन्सचा शोध घेत परग्रहावर खरोखर जीवसृष्टी आहे हा हे शोधताना एकप्रकारे आपण आपल्याचा भविष्याचा शोध घेत आहोत,” असं या अहवालाच्या शेवटी कन्सीलीस यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment