हॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्याचे वयाच्या १६ व्या वर्षी निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द फ्लॅश’ ही सुपरहिरो वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या १६ वर्षीय लोगन विलियम्सचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या निधनामागचे कारण अद्याप कळलेले नाही. अभिनेता ग्रँट गस्टिन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही दु:खद बातमी दिली.

या सिरीजमध्ये अ‍ॅलनची भूमिका साकारणार्‍या ग्रँट गुस्टिन यानेही विल्यम्सच्या मृत्यूची बातमी सांगितली. अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल त्याने आपला शोक व्यक्त केला. ग्रांटने लिहिले की, “मी केवळ लोगानच्या कौशल्यामुळेच नव्हे तर त्याच्या व्यावसायिकतेनेही प्रभावित होतो.” माझ्या प्रार्थना त्याच्या बरोबर आणि कुटूंबियांसमवेत आहेत, मला माहित आहे की त्यांच्यासाठी ही किती कठीण वेळ आहे.

 

लोगन हॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होता. त्याने ‘व्हेन कॉल्स द हार्ट’, ‘द व्हिस्पर’, ‘सुपरनॅचरल’ यांसारख्या लोकप्रिय वेब सिरींजमध्येही काम केले होते. परंतु त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘द फ्लॅश’ या सुपरहिरो वेब सीरिजमुळे. या सीरिजमध्ये तो बॅरी अ‍ॅलनच्या लहानपणाची भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय पाहून मेरिल स्ट्रीप, जॉनी डेप, विल स्मिथ यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी त्याचे कौतुक केलेले होते. त्याच्या अचानक झालेल्या या निधनामुळे हॉलिवूड कलासृष्टीत हळहळ व्यक्त केली जाते आहे. लोगनचे चाहते सोशल मीडियावरुन त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

द फ्लॅशमध्ये डॉक्टर हेनरीची भूमिका साकारणारे जॉन यांनाही लोगानच्या मृत्यूमुळे मनापासून दु: ख झाले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, तो यंग बॅरीची व्यक्तिरेखा साकारण्यात यश्वी झाला होता आणि आम्हाला कथेच्या दुसर्‍या भागात त्याची खूप आठवण आली. यानंतर अ‍ॅलन बॅरीची भूमिका ग्रँट गुस्टिनने साकारली.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

 

 

Leave a Comment