अमेरिकन हवाई दलाचं विमान समुद्रात कोसळलं; पायलटचा शोध सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । अमेरिकन हवाई दलाचं ‘एफ-१५ सी इगल’ या फायटर विमानाला सोमवारी अपघात झाला. पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या बेसवरुन एफ-१५ सी विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान उत्तर समुद्रात कोसळले. एएफपी या

वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.४० च्या सुमारास एफ-१५ सी इगल विमान उत्तर समुद्रात कोसळले. यूएस एअर फोर्सचे कॅप्टन मिरांडा टी सिमॉन्स यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून अपघाताचे कारण आणि विमानाच्या पायलटबद्दल अजून काहीही माहिती मिळू शकलेली नाही असं त्यांनी सांगितलं. ब्रिटिश एअर फोर्सकडून अपघातग्रस्त विमानाचा शोध सुरु झाला आहे.

सफोकमधील मिल्डनहॉल जवळच्या लेकनहीथ एअरबेसवरुन एफ-१५ फाटयर विमानाने उड्डाण केले होते. पूर्व यॉर्क शायरच्या किनारपट्टीपासून १३७ किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले असे बीबीसीने म्हटले आहे. अमेरिकन हवाई दलाची जगातील शक्तीशाली एअर फोर्समध्ये गणना होते. त्यांच्याकडे एकाहून एक सरस फायटर विमानं आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment