कोरोनावर नियंत्रण मिळवणं नव्हे तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय- डोनाल्ड ट्रम्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । ”कोरोनावर नियंत्रण मिळवणं नाही तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय आहे. कोरोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल,” असा विश्वास अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून कोरोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. एफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“आपल्या देशातील काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही चिंतेची बाब आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अजून बिकट होत जाणं जास्त दुर्दैवी आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. “दक्षिण अमेरिकेतील अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे,” असंही यावेळी ट्रम्प यांनी सांगितलं.

तुम्हाला मास्क वापरावाच लागेल
अमेरिकेत करोनाचा कहर असून आतापर्यंत १ लाख ४१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशवासियांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन केलं. “जेव्हा तुम्हाला सोशल डिस्टनसिंग पाळणं शक्य नाही तेव्हा तुम्ही मास्क वापरा असं आम्ही प्रत्येकाला सांगत आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. “तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, मात्र मास्क वापरावाच लागेल. मास्क घातल्याने फरक पडतो. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व करावं लागणार” असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment