‘त्या’ एका चुकीमुळं डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स झाले जगजाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरस संपूर्ण जगात थैमान घालत आहे. बलाढ्य समजल्या जाणारी अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या गंभीर वातावरणात आता ट्रम्प हे नाव वारंवार चर्चेत आहे. कधी कोरोनाच्या साथीला चीनच जबाबदार असल्याचे रोज आगपाखड करण्यावरून, तर कधी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनला पाठीशी घातल्याचा आरोप केल्याचं वक्तव्य करून ट्रम्प रोज आंतरराष्ट्रीय पटलावर चर्चेत आहेत. मात्र, वारंवार चर्चेत राहण्यासाठी धडपडणारे ट्रम्प आता एका प्रकरणात चर्चेत आल्यानं त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेनी यांनी करोनासंबंधीची माहिती देताना अनावधानाने डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सांगून त्यांना अडचणीत टाकलं आहे.

सविस्तर माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मॅकनेनी या पत्रकाराना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काय काय कामं केली? काय निर्णय घेतले ते सांगत होत्या. त्यावेळी काही दस्तावेज दाखवताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्सही सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स यामुळे जगाला समजले. १ लाख डॉलरचा चेक केली मॅकनेनी दाखवत होत्या. त्याचवेळी ट्रम्प यांच्या खासगी खात्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दाखवून टाखली.

कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं तीन महिन्यांचं वेतन अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाला दिलं आहे. यासंदर्भातच एक लाख डॉलरचा चेक साईन करण्यात आला होता. केली मॅकेनिन यांनी हा चेक दाखवताना ट्रम्प यांच्या खात्याची माहितीही देऊन टाकली. या सगळ्या प्रकारानंतर ट्रम्प सरकारच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांवरच राग काढला. ट्रम्प हे त्यांचं तीन महिन्यांचं वेतन हे कोरोनाशी लढण्यासाठी देत आहेत. ही बातमी महत्त्वाची आहे यापेक्षा त्यांचे बँक डिटेल्स सगळ्यांना समजले यालाच महत्त्व दिलं जातं आहे या गोष्टीला काय अर्थ आहे? असाही प्रश्न या अधिकाऱ्याने विचारला. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment