Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment  : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. मात्र यासाठी फक्त 31 मार्चपर्यंतच संधी असेल. अशा अनेक योजना आहेत ज्या ग्राहकांसाठी मर्यादित काळासाठीच सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY) 2020 - 2023 - 5 Changes you must  know - BasuNivesh

वय वंदन योजना

ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर लाभ देण्याच्या उद्देशाने 2017 साली केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) सुरू करण्यात आली. LIC कडून चालविल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये 60 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड पेन्शन दिली जाते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. Investment

Punjab & Sind Bank eyes Rs 1,100 crore profit amid bad loans resolution |  Business Standard News

पंजाब आणि सिंध बँकेची एफडी योजना

पंजाब अँड सिंध बँकेकडून 300 दिवसांच्या एफडीवर सुपर ज्येष्ठ नागरिकांना 8.35 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के दराने व्याज मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या बँकेच्या फॅब्युलस प्लस सुपर 601 दिवसांच्या एफडीवर 7.85 टक्के दराने व्याज देत आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के तर सर्वसामान्यांना 7 टक्के दराने व्याज मिळेल. Investment

SBI to levy charges for cash withdrawal beyond four free transactions per  month | Business News,The Indian Express

अमृत ​​कलश ठेव योजना

SBI च्या अमृत ​​कलश डिपॉझिट स्कीम या FD योजनेंतर्गत बॅंकेकून 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज मिळणार आहे. या योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल. जर सामान्य गुंतवणूकदारांनी या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना व्याज म्हणून वार्षिक 8,017 रुपये मिळतील.

Indian Bank unveils digital broking solution- The New Indian Express

इंडियन बँक एफडी योजना

इंडियन बँकेच्या IND शक्ती फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख देखील 31 मार्च 2023 आहे. 555 दिवसांच्या या एफडीमध्ये पाच हजार रुपयांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. यामधील गुंतवणुकीवर बँकेकडून 7.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. Investment

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/departments/deposit-rates/

हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव