क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर सध्या बंदी घातली जाणार नाही ! रेग्‍युलेशनच्या कक्षेत आणण्यावर झाले एकमत

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीच्या भवितव्याबाबत सध्या सुरू असलेल्या आर्थिक बाबींवर संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत डिजिटल करन्सीच्या गुंतवणुकीवर बंदी घालता येणार नाही यावर एकमत झाले आहे. मात्र, क्रिप्टोकरन्सी मार्केटच्या सदस्यांना मीटिंगमध्ये आमंत्रित केल्यामुळे, डिजिटल करन्सी गुंतवणूक नियमनाच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.