‘चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी’- देवेंद्र फडणवीस

नागपूर । महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis)

”महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, असं सांगतानाच विदेशातील गुंतवणुकीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आधी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत होती. महाराष्ट्र या गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. आता तिसऱ्या क्रमांकावर आहे,” असं फडणवीस म्हणाले.

पुढची 25 वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री राहायचे आहे. तसं विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आशावादी आहेत याचाच आनंदन आहे. त्यांना पुढचे 50 वर्षे मुख्यमंत्री राहण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राऊतांच्या विधानावर मी बोलत नाही, असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like