हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या सर्वाना गुंतवणुकीचे महत्व पटवून दिले आहे. यानंतर प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहे. यासाठी प्रत्येकजण भरपूर रिटर्न देणाऱ्या प्लॅनच्या शोधात असतो. बाजारात गुंतवणुकीचे असे पर्याय देखील आहेत जिथे अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळालेला आहे. मात्र यासाठी आपले पैसे हुशारीने गुंतवण्याची तयार हवी अन्यथा पैसे बुडण्याचा धोका देखील आहे. यासाठी गुंतवणुकीच्या योग्य पर्यायाची निवड करणे महत्त्वाचे आहे.
हे लक्षात घ्या कि, सर्वसाधारणपणे दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीत चांगला नफा मिळतो. मात्र अल्प मुदतीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांकडेही लक्ष दिले पाहिजे. बाजारात 1-5 वर्षांत दुप्पट नफा देणारे पर्याय देखील आहे. चला तर या गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत जाणून घेउयात…
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट्स
कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षासाठी पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट्स उघडता येतात. भारत सरकार कडून यासाठी बँकेच्या एफडी प्रमाणे पूर्ण गॅरेंटी दिली जाते. त्यांचा लॉक-इन कालावधी हा एक वर्षाचा असतो. मात्र आपत्कालीन परिस्थितीत यावर कर्ज घेण्याचीसुविधा देखील मिळते. Investment Tips
मनी मार्केट फंडस्
म्युच्युअल फंडांमध्ये ही सर्वात कमी धोकादायक उत्पादनांमध्ये याचा समावेश होतो. सामान्यतः, मनी मार्केट फंडस् हे अल्प-कालावधीच्या सरकारी गुंतवणूक पर्याय जसे की, कॉल मनी मार्केट्स, कमर्शियल पेपर्स, ट्रेझरी बिले आणि तीन महिन्यांपासून एक वर्षाच्या कालावधीमध्ये मॅच्युरिटी असलेल्या बँक सीडी मध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये डीफॉल्ट आणि व्याजदरातील चढउतारांचा धोका कमी आहे. Investment Tips
अल्ट्रा शॉर्ट ड्यूरेशन फंड्स
हा एक असा डेट फंड आहे ज्याद्वारे कंपन्यांना 3 ते 6 महिन्यांसाठी कर्ज घेता येते. तसेच या फंडांच्या कर्जाचा कालावधी देखील कमी असतो, त्यामुळे यामध्ये थोडी जास्त जोखीम असते. मात्र, हे फंड्स अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वात कमी धोकादायक योजनांपैकी एक आहेत. तसेच यामध्ये कमीत कमी तीन महिन्यांसाठी गुंतवणूक केली तर येथे पैसे गमावण्याची शक्यता देखील कमी असेल. या योजना त्याच कालावधीच्या FD च्या तुलनेत किंचित जास्त रिटर्न देतात. Investment Tips
लिक्विड फंड्स
लिक्विड फंडाचा वापर किमान एक दिवस ते 90 दिवसांच्या गुंतवणुकीसाठी केला जाऊ शकतो. तसेच ते रिडीम करताच, दोन ते तीन कामकाजी दिवसांत पैसे खात्यात जमा होतात. त्याच्या नेट एसेट व्हॅल्यूमध्ये फारच कमी घट बघायला मिळते. लिक्विड फंडांवरील रिटर्न टॅक्स दिल्यानंतर 4% ते 7% दरम्यान असतो. Investment Tips
आर्बिट्राज फंड
आर्बिट्राज फंडामध्ये इक्विटी आणि फ्युचर्स या दोन्ही फंडांचा समावेश असतो. यामध्ये 8% -9% वार्षिक रिटर्न मिळू शकतो. त्यांचा एक मोठा फायदा म्हणजे इक्विटी फंडाप्रमाणे त्यामध्ये पैसे गुंतवले जातात. मात्र, दीर्घकालीन नफ्यावर इक्विटीमध्ये 10 टक्के टॅक्स आकारला जातो आणि नंतर नफा किरकोळ असू शकतो. Investment Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://groww.in/fixed-deposit/post-office-fd-interest-rates
हे पण वाचा :
आपल्या Aadhar Card मधील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Multibagger Stock : सोलर सर्व्हिस पुरवणाऱ्या ‘या’ कंपनीने एका वर्षात दिला 1500% नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, आजचा भाव पहा
सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 25GB डेटा