IPL 2020 : कधी, कुठे आणि कसा पहाल मुंबई-चेन्नईचा ‘रन’संग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना गतविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी हा सामना म्हणजे मेजवानीच ठरणार आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील ही लढत रोमांचक होणार यात शंकाच नाही. जाणून घेऊया आपण हा सामना घरबसल्या कसा बघू शकतो.

कधी पाहाल सामना –
आज, शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

कुठे पाहाल सामना –
स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १ या वाहिन्यावर सामना पाहता येईल. शिवाय Disney+Hotstar VIP वरही ऑनलाइन सामना पाहू शकता.

इतिहास म्हणतं मुंबईच पारडं जड –
मुंबई आणि चेन्नई ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत २८ वेळा आमनेसामने आले असून मुंबईने १७, तर चेन्नईने ११ सामने जिंकले आहेत. सलामीच्या सामन्यात आतापर्यंत तीन वेळा मुंबई-चेन्नई एकमेकांसमोर आले आहेत. यापैंकी मुंबईने दोन, तर चेन्नईने एक लढत जिंकली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like