IPL 2020 : मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! ‘हिटमॅन’ रोहित शर्माच येणार सलामीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 आता फक्त दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे स्पर्धेबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कसून सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात यंदा रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक आणि ख्रिस लिन असे ३ मातब्बर खेळाडू असल्यामुळे सलामीला कोणत्या जोडीला पसंती द्यायची हा महत्वाचा प्रश्न मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या प्रश्नाचं उत्तर दिलं असून तेराव्या हंगामात आपणच सलामीला येणार असल्याचं जाहीर केलं आहे. सलामीच्या सामन्याआधी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स दरम्यान रोहितने याबद्दल माहिती दिली.

मी गेल्या वर्षी संपूर्ण स्पर्धेत सलामीला आलो होतो आणि यंदाही मीच सलामीला येणार आहे. पण संघाला जशी गरज असेल तसे सर्व पर्याय मी खुले ठेवणार आहे.” मुंबईकडून सलामीला कोण येणार या विचारलेल्या प्रश्नाला रोहित शर्माने उत्तर दिलं. ख्रिस लिन संघात आल्यामुळे मुंबई इंडियन्स क्विंटन डी-कॉक सोबत रोहित शर्माला संधी देणार की ख्रिस लिनला संधी देणार यावरुन बरीच चर्चा सुरु होती. अखेरीस या चर्चेला रोहित शर्मानेच पूर्णविराम दिला आहे. एखाद्या सामन्यात प्रयोग करायचा ठरल्यास ख्रिस लिन किंवा इशान किशन यासारख्या खेळाडूंना सलामीला संधी देण्यात येईल असंही रोहितने स्पष्ट केलंय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. मुंबईने आत्तापर्यंत तब्बल 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्मा, केरोन पोलार्ड , बुमराह, हार्दिक पंड्या , असे मातब्बर खेळाडू असल्यामुळे यावर्षीही मुंबई इंडिअन्सकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment