Monday, February 6, 2023

राजस्थान-हैदराबादसाठी आज ‘करो या मरो’ मुकाबला ; प्ले ऑफ साठी दोन्ही संघांना विजय आवश्यक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आता स्पर्धेचा खूपच रोमांचक क्षण जवळ येत आहे. प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी खूप मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांचं स्थान निश्चित असून चौथ्या स्थानासाठी बाकी 5 संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांपुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असतील. सनरायजर्स आठ संघाच्या स्पर्धेत गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानी आहे तर गेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविणारा राजस्थान रॉयल्स संघ त्याच्यापेक्षा एका स्थानाने पुढे आहे. सनरायजर्स संघाला प्ले-ऑफच्या आशा कायम राखण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील तर रॉयल्स संघ विजयी आगेकूच कायम राखण्यास प्रयत्नशील असेल. कर्णधार वॉर्नरला फलंदाज व गोलंदाजांकडून शानदार कामगिरीची आशा असेल.

- Advertisement -

हैदराबादच्या संघात जॉनी बेयरस्टॉ, डेविड वॉर्नर आणि केन विल्यम्सन ,आणि रशीद खान हे चारही तगडे विदेशी खेळाडू असून हैदराबादचा विजय याच खेळाडूंच्या कामगिरी वर अवलंबून आहे. सलामीवीर चांगल्या फॉर्मात असले तरी अपयशी ठरलेला मध्यक्रम ही हैद्राबाद साठी चिंतेची बाब आहे.

तर दुसरीकडे राजस्थान साठी काही वेगळी परिस्थिती नाही. स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर असे एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणारे खेळाडू संघात असूनही राजस्थानची कामगिरी म्हणावी तशी चांगली राहिली नाही. पहिल्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा संजू सॅमसनचा फॉर्म ढासळला आहे. गोलंदाजी मध्ये जोफ्रा आर्चर सोडला तर दुसरा कोणताही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. परंतु प्ले ऑफ साठी आजचा विजय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असल्याने हा सामना अटीतटीचा होईल हे मात्र नक्की.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’