नवी दिल्ली : आयपीएल चा हंगाम सुरु झाला आहे. शुक्रवारी आयपीएल ची पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघा दरम्यान होती. शुक्रवारी जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या एका फॅन ने चक्क त्याची आरती केली. अर्थात ही आरती त्यानं आपल्या टीव्ही स्क्रीन समोर केली. रोहित शर्माच्या सुपर फॅनचा व्हिडीओ व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
टीम इंडियाचा व्हॉइस कॅप्टन, सर्वात जास्त पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. आक्रमक बॅट्समन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितला त्याचे फॅन्स हिटमॅन म्हणूनही ओळखतात. रोहित शर्माचे जगभर फॅन्स आहेत.
शुक्रवारी झालेल्या आयपीएल मॅचच्या दरम्यान रोहित बॅटिंग करण्यासाठी आला आणि रोहितच्या या सुपर फॅनने रोहित बॅटिंग करायला आल्यावर टीव्ही ची आरती करायला सुरु केली. Dr. TNR. Psycho नावाच्या ट्विटवर अकाऊंट वरून हा vedio शेअर करण्यात आला आहे.
Just A Normal @ImRo45 Fan 😌⚡@TrendsRohit @mipaltan 💙#IPL2021 #MumbaiIndians #OneFamily pic.twitter.com/9YvXrTuxQC
— Dr.𝐓𝐍𝐑.Psychoᴹᴵツ💙 (@ItzTNR_) April 9, 2021
दरम्यान, रोहित शर्माला पहिल्या मॅच मध्ये मोठी खेळी करायला अपयश आलं त्यानं सुरुवात आश्वासक केली होती पण चौथा ओव्हरमध्ये क्रिस लीन सोबत उडालेल्या गोंधळाचा फटका त्याला बसला विराट कोहली ने केलेल्या रोहित शर्मा 19 रन्सवर रन आऊट झाला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group