व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल लिलावात विक्रमी बोली लागल्यानंतर इशान किशनने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

बँगलोर : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा डावखुरा विकेटकिपर बॅट्समन इशान किशन सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनला तब्बल 15.25 कोटी बोली लावून आपल्या टीममध्ये घेतले आहे. याचसोबत इशान किशन आयपीएल इतिहासातला चौथा सगळ्यात महागडा आणि भारताचा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसला 16.25 कोटी तर युवराज सिंगला 16 कोटी रुपये आणि पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपयांना आयपीएल इतिहासात विकत घेण्यात आले होते.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूवर 10 कोटींपेक्षा जास्त रकमेची बोली लावली आहे. याआधी 2011 साली मुंबईने रोहित शर्मासाठी 9.2 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती. तर 2018 आयपीएलच्या लिलावात मुंबईने कृणाल पांड्याला 8.8 कोटी रुपयांना राईट टू मॅच कार्ड वापरून आपल्या टीममध्ये परत घेतले होते. तसेच आयपीएल 2020 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलला मुंबईने 8 कोटींमध्ये खरेदी केले होते.

इशान किशनची प्रतिक्रिया
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर इशान किशनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इशान किशनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये इशान किशनने मुंबईच्या टीममध्ये घरवापसी झाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आमची मुंबई पुन्हा घरी येत आहे. पलटणला खूप मिस केलं, पुन्हा एकदा सोबत येण्याची आतुरतेने वाट पाहतोय. आपण एकत्र खूप आठवणी तयार केल्या आहेत, पण आपल्या गोष्टीची पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल टीम आणि मालकांचे धन्यवाद. लवकर भेटू,’ असे इशान किशनने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.