दुबई मध्ये भिडणार रोहित – विराट ; मुंबई आणि आरसीबी मध्ये होणार जोरदार मुकाबला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये जोरदार भिडत होणार आहे. एकीकडे विराट कोहली सारखा आक्रमक कर्णधार तर दुसरीकडे शांत डोक्याने विचार करून संघाला विजयी करणारा रोहित शर्मा… त्यामुळे नक्कीच ही लढत रोमांचक होईल यात शंकाच नाही.

गतविजेत्या मुंबईने चेन्नई विरुद्धच्या सामना ठरल्यानंतर स्पर्धेत वापसी करत कोलकात्या वर शानदार विजय मिळवला होता. कर्णधार रोहित शर्माचा सुपर फॉर्म मुंबईसाठी जमेची बाजू आहे. रोहित बरोबरच क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव , कायरन पोलार्डमुळे मुंबईची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजी मध्ये जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट चांगली चमक दाखवत आहेत. तर अष्टपैलू पंड्या बंधू मुळे मुंबईचा संघ समतोल आहे.

दुसरीकडे आरसीबी साठी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चिंतेची बाब आहे. तसेच गोलंदाजांच खराब प्रदर्शन यावर्षीही चालू आहे. आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे विराट कोहली आणि ए बी डीविलीअर्स वर अवलंबून आहे. आणि गोलंदाजी मध्ये फक्त युजवेंद्र चहलची कामगिरी चांगली आहे. अशा परिस्थितीत आरसीबी साठी आजचा सामना नक्कीच सोप्पा नसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment