Women T20 Challenge च्या तीन टीमची बीसीसीआयकडून घोषणा, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडू टीममधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बीसीसीआयने आयपीएल 2022 दरम्यान होणाऱ्या महिला टी-20 चॅलेंजच्या (Women T20 Challenge) टीमची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी सुपरनोवाज टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे, ट्रेलब्लेजर्सचं नेतृत्व स्मृती मंधानाकडे आणि व्हेलॉसिटी टीमचं नेतृत्व दीप्ती शर्माकडे देण्यात आलं आहे. या टीममधील खेळाडूंची निवडदेखील करण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असणार आहेत.

आयपीएल 2022 च्या अखेरच्या आठवड्यात महिला टी-20 चॅलेंजचे (Women T20 Challenge) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा यंदाचा हा पाचवा सीझन आहे. 23 ते 28 मे दरम्यान पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये या सगळ्या मॅच खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाची कर्णधार मिताली राज आणि फास्ट बॉलर झूलन गोस्वामीला या स्पर्धेतून आराम दिला आहे. या टीम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमशिवाय, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या 12 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.

सामन्यांचे वेळापत्रक
महिला टी-20 चॅलेंजची (Women T20 Challenge) ओपनिंग मॅच 23 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात होणार आहे. 24 मे रोजी दुपारी 3.30 वाजता सुपरनोवाज आणि व्हेलॉसिटी यांच्यात मॅच होणार आहे. तर 26 मे रोजी व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात तिसरी मॅच होणार आहे. 28 मे म्हणजेच रविवारी टी-20 चॅलेंजची फायनल मॅच होणार आहे.

महिला टी-20 चॅलेंजच्या टीम
व्हेलॉसिटी : दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शेफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगीर, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लौरा वोलवार्ड, माया सोनवणे, नत्थाकन चंतम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादुर, यास्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा.

सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, एलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिएंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशि कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सुन लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेजर्स : स्मृति मंधाना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हॅली मॅथ्यूज, जेमिमाह रोड्रिग्स, प्रियांका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, ऋचा घोष, एस मेघना, सैका इशाक, सलमा खातून, शर्मिन अख्तर, सोफिया ब्राउन, सुजाता मलिक, एसबी पोखरकर.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment