हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPPB : पोस्ट ऑफिसकडून देशभरातील नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जातात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही अशाच सुविधांपैकी एक आहे. आता IPPB च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. IPPB च्या वेबसाइटवरील अधिसूचनेनुसार, आता यापुढे IPPB ने पोस्ट ऑफिसमधील आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम (AePS) द्वारे ट्रान्सझॅक्शन चार्जमध्ये सुधारणा केली आहे. हे लक्षात घ्या कि, 1 डिसेंबर 2022 पासून लागू हे शुल्क लागू होईल. या अंतर्गत 1 पेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागेल. यामध्ये आधारद्वारे पोस्ट ऑफिसमधून पैसे काढणे, जमा करणे किंवा मिनी स्टेटमेंट घेणे याचा समावेश आहे.
IPPB ने आपल्या अधिसूचनेत सांगितले की,” जर एका महिन्यात 1 पेक्षा जास्त AePS ट्रान्सझॅक्शन केले तर अशा परिस्थितीत कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.”
किती शुल्क आकारले जाईल ???
IPPB च्या परिपत्रकानुसार, या मर्यादेनंतर आता ग्राहकांना प्रत्येक कॅश डिपॉझिट्स आणि पैसे काढण्यावर 20 रुपये + GST भरावा लागेल. दुसरीकडे, जर ग्राहकाने मिनी स्टेटमेंट मागितले तर 5 रुपये आणि चार्ज म्हणून जीएसटी भरावा लागेल.
AePS सर्व्हिस विषयी जाणून घ्या
NPCI च्या वेबसाइट वरील माहिती नुसार, “AePS हे एक बँक आधारित मॉडेल आहे, जे आधार व्हेरिफिकेशनचा वापर करून कोणत्याही बँकेच्या व्यवसायिक प्रतिनिधीद्वारे PoS (MicroATM) वर ऑनलाइन इंटरऑपरेबल आर्थिक समावेशन ट्रान्सझॅक्शन्सना परवानगी देते. AePS द्वारे आपल्याला सहा प्रकारचे ट्रान्सझॅक्शन्स करण्याची परवानगी दिली जाते.
यासाठी काय आवश्यक आहे ???
मात्र इथे हे लक्षात घ्या कि, AePS द्वारे कोणत्याही प्रकारचे ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी ग्राहकांना फक्त तीन अटी पूर्ण कराव्या लागतील. असे कोणतेही ट्रान्सझॅक्शन्स पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना बँकेचे नाव, आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंट द्यावे लागतील.
AePS द्वारे मिळतील ‘या’ बँकिंगच्या सुविधा
मिनी स्टेटमेंट
रकम जमा करा
पैसे काढणे
बॅलन्स इंक्वायरी
आधार टू आधार फंड ट्रांसफर
भीम आधार पे
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ippbonline.com/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 4000% रिटर्न !!!
Bank FD : ‘या’ बँकेच्या स्पेशल FD वर मिळेल 8.50 टक्के व्याज !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आज 141 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
RBL Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याजदर पहा
Multibagger Stock : ऑटो क्षेत्रातील ‘या’ कंपनीने अडीच वर्षात दिला तीन पट नफा