IRCTC ने 4 कोटी युझर्ससाठी सुरु केली ‘ही’ सुविधा, आता त्वरित दिली जाणार आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । IRCTC च्या चार कोटी युझर्सना दिलासा देणारी ही मोठी बातमी आहे. तिकीट रिफंडची माहिती घ्यायची असेल, पीएनआर स्टेटस माहिती करून घ्यायची असेल किंवा ट्रेन बाबत माहिती घ्यायची असेल. अशा प्रकारच्या क्वेरीज साठी लोकांना आता वाट पाहत बसण्याची आवश्यकता नाही. त्वरित उत्तर मिळेल. IRCTC ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) ने सुसज्ज असा एक चॅट बॉटचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे.

IRCTC ने वेबसाइट आणि अ‍ॅपवर चॅट बॉटचा पर्याय तयार केला आहे, ज्यामध्ये प्रवासी कोणत्याही प्रकारचे प्रश्न टाइप करू शकतात, जर ते टाइप करू शकले नाहीत तर ते विचारू शकतील.

अशाप्रकारे होईल फायदा
आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार रिफंड किंवा तिकिटाशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी यापूर्वी मेल पाठवावा लागत होता आणि त्यानंतर उत्तराची वाट पहावी लागत होती, पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लगेचच उत्तर दिले जाईल. यासाठी IRCTC आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन लर्निंग प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.

दररोज 10 लाख क्वेरिज
रेल्वेशी संबंधित माहितीसाठी दररोज सुमारे 10 लाख क्वेरिज प्राप्त होतात. यासाठी प्रवाशांना 139 या क्रमांकावर, एसएमएस किंवा मेल पाठवावा लागतो. आता सर्व लोकं या चॅट बॉटवर विचारू प्रश्न शकतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता कामाचा लोड कमी होईल.

https://t.co/A2Q5y6bWP3?amp=1

वैशिष्टय

> चॅट बॉट 24 तास काम करेल. – सर्वप्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील.
> उत्तरासाठी वाट पहावी लागणार नाही.
> सध्याच्या काळात कामांमध्ये वापरली जाणारी संसाधनांची बचत होईल.

https://t.co/iMzLk2Rqf0?amp=1

बदलली आहे IRCTC वेबसाइट
IRCTC ने आपल्या वेबसाइटमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत जेणेकरुन ती वापरकर्त्यासाठी अनुकूल बनू शकेल. जुन्या वेबसाइट साठी प्रत्येक दिवशी लोकं सोशल मीडियावर तक्रारी करत असत. हे लक्षात घेऊनच सरकारने आज नवीन अवतारात आयआरसीटीसीची वेबसाइट लाँच केली आहे. नवीन वेबसाइटमध्ये, पेमेंट पेज आधी सुधारित केले गेले आहे, जेणेकरून पेमेंट पर्याय निवडणे सुलभ होईल. या व्यतिरिक्त, विद्यमान स्थिती पूर्वीपेक्षा वेगवान केली गेली आहे. सेव्ह केलेल्या प्रवाशांच्या डिटेल्ससाठी आपल्याला प्रिडिक्टिव एंट्री, निवडलेला क्लास आणि ट्रेनची माहिती एका क्लिकवर मिळेल.

https://t.co/8qRGA9BFlQ?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment