IRCTC SBI Card Premier: ट्रेनच्या तिकिटांच्या बुकिंगवर मिळवा 10% फ्लॅट कॅशबॅक, या कार्डची वैशिष्ट्ये जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण देखील ट्रेनने प्रवास करत असाल तर आयआरसीटीसी एसबीआय कार्ड प्रीमियर (IRCTC SBI Card Premier) आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला आयआरसीटीसीचे अ‍ॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून ट्रेनच्या तिकिट बुक करण्यावर 10% फ्लॅट कॅशबॅक मिळेल. या क्रेडिट कार्डासाठी एसबीआय कार्डने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आईआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) बरोबर भागीदारी केली आहे.

कार्डची वैशिष्ट्ये
>> आयआरसीटीसी वेबसाइट irctc.co.in किंवा मोबाईल अ‍ॅप (अँड्रॉइड) या मार्फत बुकिंग करतांना एसी -1, एसी -2, एसी -3 आणि एसी-चेअर कारच्या तिकिट बुकिंगवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या रूपात 10 टक्के व्हॅल्यूबॅक उपलब्ध आहेत.
>> या कार्डच्या माध्यमातून air.irctc.co.in वर फ्लाईट्सच्या तिकिट बुकिंगवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या रूपात 5 टक्के व्हॅल्यूबॅक देण्यात आला आहे.
>> ecatering.irctc.co.in या कार्डच्या माध्यमातून ई-कॅटरिंग खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या रूपात 5 टक्के व्हॅल्यूबॅक देण्यात आला आहे.
>> या कार्डच्या माध्यमातून आयआरसीटीसीची वेबसाइट irctc.co.in वर तिकीट बुकिंगसाठी 5% ट्रान्सझॅक्शन चार्ज द्यावे लागणार नाही.
>> या कार्डद्वारे air.irctc.co.in वर फ्लाईट्सचे तिकिट बुक करण्यासाठी 1.8% ट्रान्सझॅक्शन चार्ज द्यावा लागणार नाही.
>> वेलकम गिफ्ट म्हणून 1500 रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध असतील.
>> या कार्डच्या माध्यमातून आपण वर्षामध्ये 8 वेळा रेल्वे लाउंजमध्ये एक्सेस करू शकता. तथापि, आपण एका तिमाहीत 2 वेळा रेल्वे लाउंजमध्ये एक्सेस करू शकता.

माईलस्टोन कॅशबॅक
>> एका वर्षात 50 हजार रुपये प्रवास खर्च करून 2500 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात.
>> एका वर्षात 1 लाख रुपयांचा प्रवास खर्च करून 5000 वॉर्ड पॉईंट्स मिळतात.
>> एका वर्षामध्ये 2 लाख रुपये खर्च केल्यावर वार्षिक फी रिव्हर्स होईल.

आयआरसीटीसी एसबीआय कार्ड प्रीमियर चार्जेज
>> या कार्डची जॉइनिंग फी 1499 रुपये आहे.
>> या कार्डची वार्षिक फी 1499 रुपये आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment