Google गुप्तपणे गोळा करतो आहे तुमची माहिती ? कंपनीवर लागले गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अमेरिकन टेक दिग्गज गुगल (Google) वर युझर्सची माहिती गोळा करण्याचा आणि गुप्तपणे मॉनिटरिंग केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण अमेरिकेतील असून आता कंपनीकडून सुमारे 5 अब्ज अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 36370 कोटी दंड आकारला जाऊ शकतो. वास्तविक, अमेरिकेच्या एका युझरने कंपनीविरूद्ध खटला दाखल केला होता, ज्याची सुनावणी अमेरिकेच्या कोर्टात झाली.

काय आरोप आहे जाणून घ्या ?
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, युझर्सने कंपनीकडून गुप्त माहिती मिळवल्याचा आरोप केल्याची तक्रार केली होती आणि असे म्हटले होते की,”जेव्हा क्रोम ब्राउझर आणि त्यांचे प्रायव्हेट इनकॉग्निटो मोड (Incognito mode) वापरत असताना देखील Google त्यांना ट्रॅक करते आणि त्यांची माहिती गोळा करते. हा खटल्याची सुनावणी करताना कॅलिफोर्नियाचे राज्य जिल्हा न्यायाधीश लुसी कोह (Lucy Koh) म्हणाले की,” युझर्सनी प्रायव्हेट ब्राउझिंग Incognito mode मध्ये युझर्सचा डेटा गोळा केल्याची माहिती Google कडून देण्यात आली. तथापि, गुगलने या प्रकरणावर आक्षेप नोंदवित त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावला आहे.

गूगल काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या?
या प्रकरणात, गूगलने स्पष्टीकरण दिले की, इनकॉग्निटो मोड युझर्सना डिव्हाइस किंवा ब्राउझरवर त्यांच्या एक्टिविटीज एकत्र न करता इंटरनेट ब्राउझ करण्याचा पर्याय देते. कंपनीने असे म्हटले आहे की,”प्रत्येक वेळी जेव्हा एखादा युझर्स नवीन टॅब उघडतो, तेव्हा वेबसाइटवर त्यांच्या ब्राउझिंग एक्टिविटीजची माहिती गोळा केली जाते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment