निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हे काय वित्त नियोजन आहे का?’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल, पुडुचेरी, आसाम, केरळ, तमिळनाडू या पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पेट्रोलने राज्यामध्ये शंभरी गाठली आहे. त्यामुळे आधीच कोरोना संकट आणि त्यात इंधन दरवाढ त्यामुळे सामान्य माणूस हा बेजार आला आहे. याच इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.

निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्याची दरवाढ केली जाते हे काय वित्त नियोजन आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. कोरोना परिस्थितीत वाढलेलय पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा बाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक पेट्रोलचा दर आहे. परभणीत पेट्रोलचा दर १००. 75 तसंच डिझेलचा दर 90. 68 रुपये दराने विक्री केली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती मध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.5 रुपये आणि डिझेलची किंमत 82. 61 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईतही पेट्रोलचे दर 98.7 तीस रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९ . 75 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहेत. असं त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वेगळाच दर्जाचे वित्त नियोजन करत आहेत यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रकाश टाकायला हवा असे मत जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे.

Leave a Comment