Monday, February 6, 2023

सरकार खरोखरच प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने अंतर्गत मुलींना देत आहे 2000 रुपये ? अधिक तपशील जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून मुलींसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. सरकार मुलींच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण आणि लग्नापर्यंत विविध योजनांद्वारे मदत करते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार ‘प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने’ अंतर्गत मुलींना दरमहा 2000 रुपये देत आहे. चला तर मग या मेसेज मागील सत्य जाणून घेऊयात …

हे व्हायरल मेसेज मागील सत्य आहे
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने’ अंतर्गत, केंद्र सरकारकडून आर्थिक मदत म्हणून ₹ 2000 ची रक्कम दिली जाईल.’

- Advertisement -

युट्यूब चॅनेलवर केला दावा
यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता ज्यात ‘प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने’ बाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. या चॅनेलमध्ये, एक व्यक्ती असा दावा करते की ‘प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने’ अंतर्गत कोणत्याही सरकारी बँकेत खाते उघडल्यावर केंद्र सरकार दरमहा 2000 रुपये त्या खात्यात ट्रान्सफर करेल.

सरकारने हा मेसेज बनावट असल्याचे सांगितले
PIB फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली आहे. PIB ने आपल्या ट्विटरवरून इशारा दिला आहे की, सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे.

आपण देखील फॅक्ट चेक करू शकता
जर तुम्हालाही असा काही मेसेज आला असेल, तर तुम्ही तो PIB ला https://factcheck.pib.gov.in/ किंवा whatsapp नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर पाठवून शकता. ही माहिती PIB वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.