वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार का ? मुंबई पोलीसांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री ला परवानगी दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्षांनी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे सरकारने सांगितलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवम वहिया यांनी ट्विट करत वाईन पिऊन गाडी चालवल्यास शिक्षा होईल का असा प्रश्न पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी देखील तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले.

मी वाईन पिऊन वाहन चालवले तर मुंबई पोलीस मला तुरुंगात टाकतील की जवळचा बार दाखवतील असं शिवम यांनी मिश्कीलपणे विचारलंय. या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीदेखील तेवढ्याच चपखल पद्धतीने उत्तर दिले आहे. जर तुमची चाचणी केल्यानंतर तुमच्या शरीरात अल्कोहोल आढळले तर आम्ही तुमच्यावर निश्चित कारवाई करु. तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात सुपर मार्केट आणि दुकानात वाईन विक्री ला परवानगी देण्यात आल्यानंतर सरकार वर टीका झाली. मात्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले. तसेच वाईन आणि दारू मध्ये खूप फरक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटल होत.

Leave a Comment