आम्ही कोरोनावर ‘लस’ शोधली! इस्राइलचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटातून जात आहे. कोरोनामुळे जीवितहानी सोबत आर्थिकहानीचा सुद्धा फटका जगाला बसत आहे. यावर शेवटचा रामबाण इलाज एकच तो म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला रोखणारी लस. अशावेळी इस्राइलने (Israel) कोरोना व्हायरसवर (Israel Developed Coronavirus Vaccine ) लसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांचं म्हणणं आहे की इस्राइलने करोनावर लस (Israel Covid-19 Vaccine ) तयार केली आहे आणि लवकरच त्याच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाअंतर्गत अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या संशोधनाबाबत नफ्ताली यांनी लसीची घोषणा केली. नफ्ताली यांच्या दाव्यानुसार ही लस मोनोक्लोनल न्यूट्रॅलिटींगनुसार शरीरातील व्हायरसवर हल्ला करते आणि शरीरातच कोरोनाच्या विषाणूंचा नायनाट करते. नफ्ताली बेनेट यांच्यावतीने याबाबत एक अधिकृत पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. यात त्यांनी करोनावर लस शोधल्याबद्दल त्यांच्या संशोधकांचं अभिनंदन देखील केलं आहे. शिवाय, याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्यासाठी संपर्क साधण्यात येईल, असंही म्हटलं आहे.

दरम्यान, या लसीचं मनुष्यप्राण्यावर चाचणी केली गेल्याचं पत्रकात कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही. इस्राइलने करोनाच्या जागतिक उद्रेकानंतर तातडीने आपल्या देशाच्या सीमा सील केल्या होत्या. शिवाय, नागरिकांच्या प्रवासावरही निर्बंध आणले होते. इस्राइलमध्ये सध्या १६,२४६ करोनाबाधित रुग्ण असून २३५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment