‘फक्त बनावट नोटा बाळगल्या म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही’; जाणून घ्या हायकोर्टाचे म्हणणं तरी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या वर्षी पुण्यातील अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये ५लाख ६४ हजार ५०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा आढळल्या. यांनतर कारमधील दोघा तरुणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, तरुणांच्या जमीन अर्जावर सुनावणी वेळी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना जमीन मंजूर करत, ‘बनावट नोटा केवळ बाळगल्याच्या कारणाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी पुण्यातील राहुल वचकळ (वय १९) याला जमीन मजूर करताना म्हटलं कि, ‘बनावट नोटा केवळ बाळगल्याच्या कारणाखाली गुन्हा दाखवला जाऊ शकत नाही. नोटा बनावट असल्याची पूर्ण जाणीव असूनही त्या चलनात आणल्याचे किंवा त्या वापरल्याचे दाखवणारे पुरावे हवेत. हे दाखवणारे पुरावे आरोपपत्रात दिसत नाहीत. त्यामुळे तरुण वय असलेल्या आरोपीला अधिक काळ गजाआड ठेवता येणार नाही.’ याशिवाय आरोपी तरुणाने खटल्यातील सुनावणीला नियमितपणे हजेरी लावावी तसेच खटल्यातील सरकारी पक्षाच्या पुराव्यांमध्ये फेरफार करू नये, अशा अटीही न्या. भारती डांगरे यांनी आपल्या आदेशात घातल्या.

प्रकरण काय होते?
गेल्या वर्षी पुण्यातील अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना पुण्यातील आंबेडकर कॉलेजवळ एका कारमध्ये पाच लाख ६४ हजार ५०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा आढळल्या. त्यानंतर त्यांनी या कारमध्ये असणारे राहुल वचकळ (१९) व शुभम क्षीरसागर (२४) यांच्याविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment