फडणवीसांना जाणीवपूर्वक अडकवण्याची राज्य सरकारची भूमिका नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवलेली नोटीस आणि चौकशी यावरून आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्षनेत्यांना अडकवण्याचा कोणताही हेतू राज्य सरकार चा नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आरोपी म्हणून नोटीस पाठवली नव्हती तर त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना हवी होती म्हणून ती नोटीस होती असेही वळसे पाटील सांगितले.

विरोधी पक्षनेत्यांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून नव्हती पाठवली, त्यांच्याकडे माहिती मिळाली ती कुठून मिळाली याबाबत होती. त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा कशात फसवण्याचा राज्य सरकारची भूमिका नाही. पोलीस चौकशी करतील आणि त्याचा अहवाल येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांचे जबाब नोंदवले आहेत. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी काहीही प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा नियमित तपासाचा भाग आहे. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालाही विशेषाधिकार नाहीत. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचा, कुठल्या कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही असं त्यांनी सांगितले.

Leave a Comment