IT Rules 2021: गुगल आणि फेसबुकने सादर केला पहिला अहवाल, रविशंकर प्रसाद यांनी केले कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आयटी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नवीन आयटी नियमांनुसार (IT Rules 2021) गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आपत्तीजनक पोस्ट स्वयंचलितपणे हटविण्याविषयी आपला पहिला कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे आणि ते पारदर्शकतेबाबत एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले.

दरमहा अहवाल जारी केला जाईल
आयटीच्या नवीन नियमांनुसार, 50 लाखाहून अधिक युझर्ससह मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महिन्यात मिळालेल्या तक्रारी आणि त्यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करून कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश करावा लागेल.

प्रसाद यांनी ट्वीट केले की, “गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या महत्त्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन आयटी नियमांचे होणारे पालन पाहून आनंद होत आहे. नवीन आयटी नियमांनुसार आक्षेपार्ह पोस्ट स्वयंचलितरित्या काढून टाकण्याबाबत पहिला कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश करणे ही पारदर्शकतेची एक मोठी पायरी आहे.”

ट्विटरवरील दबाव वाढणार
गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम कडून कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश झाल्याने ट्विटरवरील दबाव वाढू शकतो, ज्यांचा नवीन नियमांवरून केंद्र सरकार बरोबर वाद सुरु आहे. देशातील नवीन आयटी नियमांचे पालन न केल्याने आणि त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्याबद्दल सरकारने ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती.

गुगल, इंस्टाग्राम, कु आणि फेसबुकने सादर केला पहिला अहवाल
शुक्रवारी आपल्या पहिल्या मंथली कम्पलाइंस रिपोर्टमध्ये फेसबुकने म्हटले आहे की, त्यांनी देशात 15 मे ते 15 जून दरम्यानच्या 10 प्रकारच्या उल्लंघनांमध्ये 3 कोटी हूनही अधिक कन्टेन्टवर कारवाई केली. इन्स्टाग्रामने याच कालावधीत सुमारे दोन कोटी पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्सवर कारवाई केली.

गूगल आणि यूट्यूबकडे स्थानिक कायद्यांचे किंवा वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या वर्षी एप्रिलमध्ये भारतातील युझर्सकडून 27,762 तक्रारी आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी, 59,350 कन्टेन्ट (पोस्ट्स, फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्स) काढले असल्याचे म्हटले आहे. भारतीय सोशल मीडिया कंपनी कु यांनीही या संदर्भातील आपला अहवाल दिला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment