दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय माझाच ; रोहित शर्माचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर आणि स्टार फलंदाज रोहित शर्माची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T 20 मालिकेसाठी निवड न करण्यात आल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. यावरूनच निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते. आयपीएल मध्ये खेळताना रोहित फिट दिसत असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नक्की त्याला काय प्रोब्लेम आहे म्हणून निवड समितीने त्याची निवड केली नाही असा सवाल अनेक माजी क्रिकेटपटूनी केला होता. आता खुद्द रोहित शर्माने यावर स्पष्टीकरण दिलं असून दुखापतीमुळे मीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली होती अस रोहित म्हणाला.

ऑस्ट्रेलियात दौऱ्यात ११ दिवसांत सहा मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यामुळेच मी हे सामने न खेळण्याचा मी निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण रोहितने दिले आहेत.‘‘मला पुनर्वसन प्रक्रियेसाठी साडेतीन आठवडय़ांचा कालावधीत हवा होता. जर मी दुखापत सावरण्यास वेळ दिला, तर कदाचित कसोटी सामने खेळू शकेन, अशी आशा होती. मी घेतलेला हा साधा निर्णय इतका जटिल का झाला, हे मलाही कळले नाही,’’ असे रोहितने सांगितले.

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांसाठी वगळलेला रोहित काही दिवसांत ‘आयपीएल’मध्ये परतल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्याचा भारताच्या कसोटी संघात आश्चर्यकारक समावेश करण्यात आला.  यासंदर्भात रोहित म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर काय घडत होते, याबाबत मला काहीच कळत नव्हते. लोक मात्र बरीच चर्चा करीत होते. परंतु मी मात्र बीसीसीआय व मुंबई इंडियन्सच्या सातत्याने संपर्कात होतो, असे रोहित म्हणाला.

माझी दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती, याची मला खात्री होती. परंतु काय घडले, याबाबत मी अनभिज्ञ आहे. परंतु येत्या काही दिवसांत मी ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी सज्ज होईन, अशी आशा रोहितने व्यक्त केली आहे. सध्या रोहित बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत पुनरागमनाची तयारी करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment