मुंबई । मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात (Marathwada graduate constituency) उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी बंड करत आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षात प्रवेश झाला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत मोठे गौप्यस्फोट केले. ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत’ अशा शब्दात जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला (Bjp) मोठा धक्का बसणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
जयसिंगराव गायकवाड यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
“एवढ्या वर्षांपासून आम्ही केलं. आंदोलन, उपोषण, किती मेहनत केली. पोलिसांच्या लाठ्या खाल्या. भाजपमध्ये आता जे आहेत त्यापैकी कुणीच नव्हतं. तेच काय त्यांचे बापही नव्हते. बाप म्हणजे आदराने बोलतोय. आता जे आहेत त्यांना विचारा कुणीतरी की, तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का? काही नाही फक्त आयत्या पिठावर हे रेघा मारायला आले आहेत. आता मी आलोय साहेब. येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत”, असा घणाघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जयसिंगराव गायकवाड यांनी केला.
“कुणाला साथ द्यायची, कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे. कामाचा पत्ता नाही. पण मी पणा भरपूर आहे. अशा लोकांशी कसं काम करायचं?”, असा सवाल जयसिंगराव यांनी केला. (Jaisingh Gaikwad enter in ncp today criticized on bjp)
रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार हे माहितीचं नव्हतं! सरकार स्थापनेच्या 'त्या' विधानावर शरद पवारांचा टोला
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/mvGcizf2QW@raosahebdanve @PawarSpeaks @NCPspeaks #HelloMaharashtra @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
ईडी'चा छापा हा कुणाच्याही घरावर पडू शकतो अगदी माझ्याही; रावसाहेब दानवेंनी सेनेचे आरोप धुडकावले
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/iwLZGTVenN@PratapSarnaik @raosahebdanve @BJP4Maharashtra @ShivSena #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/gwD47XIyJY@ChDadaPatil @BJP4Maharashtra @INCMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’