शेतीच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे थेट सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद तसेच परिसरात सप्टेंबर महिन्यात तीनदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. यातूनच औरंगाबादमधील एका शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मंगळवारी जलसमाधी आंदोलन केलं.

अतिवृष्टीमुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याची सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी औरंगाबादमधील तरुणाने सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील पाण्याची पातळीही वाढलेली आहे. शेतीची नुकसान भरपाई नाही मिळाली तर विष प्राशन करून जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही या तरुणाने दिला. पुढील दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा विष प्राशन करुन घेणार असल्याचा इशारा तरुणाने दिला.

मराठवाड्यात मागील चार महिन्यांत सर्वाधिक पावसामुळे कमीत कमी 91 जणांचा मृत्यू झाला तर 25 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मराठवाड्यात मान्सूनच्या काळात होणाऱ्या एकूण 679.5 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत या वर्षी 1,041.5 मिलीमीटर पाऊस झाला.

Leave a Comment