जम्मू -काश्मीर: नियंत्रण रेषेवर दिसून आल्या संशयास्पद हालचाली, उरीमध्ये लष्कराची शोधमोहीम सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । उत्तर काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर भारतीय लष्कराने रविवारी नियंत्रण रेषेवर (LOC) शोधमोहीम सुरू केली. मात्र, आतापर्यंत कोणताही संपर्क स्थापित झाला नाही, लष्कराने देखील उरीमध्ये घुसखोरी झाली आहे की नाही हे अनिश्चित असल्याचे म्हंटले आहे. संरक्षण जनसंपर्क अधिकारी कर्नल अमरोन मोसावी म्हणाले, “उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर काल रात्री संशयास्पद हालचाल दिसून आली.ज्यामुळे या परिसरात शोधमोहीम सुरू झाली आहे.”

या वर्षी उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये घट झाली आहे, विशेषत: उरी, नौगाम, तंगधार, केरन, माचिल आणि गुरेझ सेक्टरमध्ये. लष्कराच्या 19 पायदळ आणि 27 पायदळ विभागातील अधिकाऱ्यांनीही नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये घट झाल्याचे मान्य केले. 19 पायदळ आणि 27 पायदळ विभागांवर उरी ते गुरेझपर्यंत नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे.

उत्तर काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, “सतर्कता कमी केली जाऊ शकत नाही. परिस्थिती कधी बदलेल हे आपल्याला माहित नाही. आमचे जवान सतत लक्ष ठेवून आहेत. नियंत्रण रेषेवर कडक दक्षतेमुळे घुसखोरीची प्रकरणे कमी झाली आहेत.”

अधिकार्‍यांनी सांगितले की,” सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने घुसखोरीच्या दृष्टिकोनातून नेहमीच महत्त्वाचे असतात, कारण मोठ्या हिमवर्षावामुळे पास आणि रिजचा वापर सहसा घुसखोरीसाठी केला जातो.” अधिकृत सूत्रांनी सांगितले की,”गेल्या काही महिन्यांत काश्मीरच्या विविध भागात घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत.”

Leave a Comment